Home वणी परिसर काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

618

वणी बातमीदार:

वणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होती. त्याला मुहूर्त मिळाला आहे.  बुधवारी तालुक्याची काँग्रेस पक्षाची कार्यकारणी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष पक्षबांधणी ला सुरवात करताहेत. अनेकांचे पक्ष प्रवेश सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी प्रमोद वासेकर यांची नियुक्ती आधीच करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आपल्याला कार्यकारिणीत स्थान मिळेल की नाही याची वाट बघत होते.

कार्यकारणी गठीत करण्यासाठी दि 21 जुलै ला मुहूर्त सापडला. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वणी तालुक्याची काँगेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  यावेळी कमेटी मध्ये 08 उपाध्यक्ष, 08 महासचिव, 08 सचिव, 08 सहाय्यक सचिव, 01कोषाध्यक्ष,व कार्यकारी सदस्य 68 अशी 101 सदस्यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी गठीत करतांना प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला या कमेटीत सामावून घेऊन नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. टीकाराम कोंगरे, डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. भाऊराव कावडे, संजय खाडे, विवेक मांडकार, पुरुषोत्तम आवारी, मंगल मडावी, सुरेश काकडे, ओम ठाकुर, डँनी सँड्रावार, डेव्हीड पेरकावार, महीला अध्यक्षा ज्योती सुर, वंदना आवारी, वंदना धगडी, मंगला झिलपे, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, गणेश पायघन तथा तालुका कॉग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यत पोहचण्याचा मानस तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी व्यक्त केला.