Home Breaking News कार व दुचाकीची धडक, गंभीर जखमींचा मृत्यू

कार व दुचाकीची धडक, गंभीर जखमींचा मृत्यू

● साई मंदिर जवळ घडला अपघात

3743
C1 20240404 14205351

साई मंदिर जवळ घडला अपघात

Wani News | रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आपल्या राजूर गावी दुचाकीने परतत असलेल्याना कारने जबर धडक दिली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. यातील गंभीर जखमींचा चंद्रपूर येथे रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ मार्गावरील साई मंदिर जवळ घडली. Two bikers were injured in this accident. The seriously injured died in a hospital in Chandrapur.

आकाश रतन गाडेकर (26) असे अपघातातील गंभीर जखमीचे नाव असून त्याचा चंद्रपूर ला नेत असताना मृत्यू झाला तर दुचाकी चालवीत असलेला रंजित हिरामण खोब्रागडे (28) हा किरकोळ जखमी झाला आहे. ते दोघेही राजूर कॉलरी येथील निवासी होते.

रविवारी वणीतील आपले काम आटोपून ते दोघे दुचाकी क्रमांक MH-29- BY 7073 ने गावी परतत होते. त्याच वेळी मागाहून भरधाव येत असलेल्या स्कॉर्पियो क्रमांक MH- 29- BE 7266 ने जबर धडक दिली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेला तरुण आकाश हा गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी आकाश ला त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर ला हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून चारचाकी वाहनासह पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी तपासाअंती स्कॉर्पियो चालक अनिल धर्माजी भोयर (47) यांचेवर गुन्हा नोंद केला आहे.
Rokhthok News