Home Breaking News बस सेवा सुरू असती तर शिक्षिकेवर चाकूहल्ला झाला नसता….!

बस सेवा सुरू असती तर शिक्षिकेवर चाकूहल्ला झाला नसता….!

516
C1 20240404 14205351
शिवसेनेचा गंभीर आरोप, तात्काळ रस्ता दुरुस्त करा

वणी: नायगाव (बु) येथे कार्यरत शिक्षिकेवर दि. 18 ऑगस्टला जीवघेणा हल्ला झाला. बससेवा सुरू असती तर ही लाजीरवाणी घटना घडली नसती. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बससेवा बंद आहे हे सत्य गृहीत धरून नायगाव (बु) ते पुनवट कोल वॉशरी पर्यंत मार्गाचे नूतनीकरण तात्काळ करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने SDO व PWD ला दिले आहे.

नायगाव(बु) ते मुख्य मार्गापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्यामुळे राज्य मार्ग परिवहन विभागाने मागील तीन वर्षांपासून बससेवा सुध्दा बंद केली आहे. गावातून बस नसल्याने ती शिक्षिका मुख्य मार्गावर बसची वाट पाहात होती आणि त्याच वेळी तिच्यावर चाकू हल्ला झाला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावात स्टेट बँक असून परिसरातील अनेक गावाचा राबता असतो. शेकडो शालेय विदयार्थी शिक्षणाकरिता वणी -घुगूस- चंद्रपूर इत्यादि ठिकाणी ये- जा करतात. नायगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. आजूबाजूच्या गावातील रुग्णांचा येथे सातत्याने वावर असतो. गावापासून पूनवट कोल वॉशरीच्या महा मार्गापर्यंत तातडीने रस्त्याचे नवनिर्माण करावे जेणेकरून बससेवा सुरळीत सुरू होईल व स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

संबंधित विभागाने पंधरा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त करून परिवहन सेवा सुरळीत चालू करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका संघटक गणपत लेडांगे, शहर प्रमुख सुधीर थेरे, महेश चौधरी, डॉ. विलास बोबडे, गजू पाचभाई, संभा मत्ते, संजय डवरे, ज्ञानेश्वर देवतळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
वणी : बातमीदार