Home Breaking News नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

● मंदर येथील निर्गुडा नदीपात्रातील घटना

2570
C1 20240404 14205351

मंदर येथील निर्गुडा नदीपात्रातील घटना

IMG_20230824_191612
मृतक बबीता बुरडकर

Wani News | तालुक्‍यातील मंदर येथील निर्गृडा नदिपाञात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्‍याने चांगलीच खळबळ माजली. महिला मंदर येथील असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असुन तिला फिट येत असल्‍याचे बोलल्‍या जात आहे. The dead body of a 35-year-old woman was found in Nirgrida river.

बबीता बाळा बुरडकर (35) असे मृतक महिलेचे नांव आहे. ती मंदर येथील निवासी असुन ती मतीमंद असल्‍याची माहिती स्‍थानिकांनी दिली आहे. तसेच तीला फिट येत असल्‍याचे सुध्‍दा बोलल्‍या जात आहे. घटनेच्‍या दिवशी दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास निर्गृडा नदिपाञात तिचा मृतदेह आढळुन आला.

प्रत्‍यक्षदर्शीने याप्रकरणी ग्रामस्‍थांना माहिती दिली तसेच पोलीसांना सुचित करण्‍यात आले. पोलीसांनी घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला आणि शव उत्‍तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्‍णांलयात पाठविण्‍यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असुन ती नदीकडे कशाला गेली होती हे तपासाअंती स्‍पष्‍ट होणार आहे.
Rokhthok News