Home Breaking News दहावीत शिकणारा विद्यार्थी “बेपत्ता”

दहावीत शिकणारा विद्यार्थी “बेपत्ता”

1077
C1 20240404 14205351

पालकांची पोलिसात तक्रार

शाळेत जाण्यासाठी तो ऑटो ने निघाला मात्र तो शाळेत पोहचलाच नाही आणि घरीही परतला नाही. अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर पालकांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

कृष्णा प्रवीण काकडे (16) असे बेपत्ता झालेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे. तो पळसोनी येथील रहिवासी असून शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये इय्यता 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे.

मंगळवार दि. 23 नोव्हेंबर ला तो सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. घरून निघतांना त्याने पैसे व काही कपडे सोबत घेऊन निघाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कृष्णा, ऑटो ने साई मंदिर चौकात उतरला व मित्राचे बुक परत करण्यासाठी शाळेत गेला होता. शाळेत आज का आला नाही म्हणून शिक्षकाने त्याला विचारणा केली होती. आज घरचे काम असल्याने मी शाळेत येऊ शकलो नसल्याचे त्याने शिक्षकाला सांगून निघून गेला.

सायंकाळ पर्यंत घरी परतला नसल्याने पालकांनी शाळेत विचारणा केली. तो शाळेत आलाच नसल्याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
वणी: बातमीदार