Home Breaking News मनसेचा दणका, पालिका लागली कामाला

मनसेचा दणका, पालिका लागली कामाला

926
C1 20240404 14205351

झुडपांची कापणी युद्धस्तरावर

रोखठोक | नांदेपेरा मार्गावरील मनीष नगर परीसरात वाघ दिसल्याची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मनीष नगर पासून रेल्वे क्रॉसिंग पर्यंत वाढलेली झुडपं वाघाच्या वास्तव्यासाठी कारणीभूत असल्याने ती तात्काळ साफ करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. मनसेच्या अल्टीमेटममुळे पालिका कामाला लागली असून झुडपं काढण्यात येत आहे.

शहराच्या अवतीभवती वाघाचा वावर वाढलेला आहे. दरदिवशी कुठे ना कुठे वाघ्रदर्शन होत आहे. तीन दिवसापूर्वी नांदेपेरा मार्गावरील मनीष नगर परिसरात वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या. वाघाचा वावर असल्याची कुणकुण नागरिकांना लागली यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नांदेपेरा मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक शतपावली करिता फिरत असतात, या मार्गावरून चाकरमानी रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावून घरी येतात. महत्वाचे म्हणजे नांदेपेरा मार्गावर शाळा व महाविद्यालय असून शहरातील विद्यार्थी सायकल, दुचाकीने शाळेत जातात. झुडुपात दबा धरून बसलेला वाघ झडप घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुरुवारी पहाटे शहरालगत असलेल्या ब्राम्हणी शिवारात वाघाने मजुरावर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. वाघाचा ठिकठिकाणी मुक्तसंचार सुरू आहे. खबरदारी बाळगणे गरजेचे झाले आहे. दाट झाडी- झुडपे असलेल्या परिसरात वाघ दबा धरून बसू शकतो. तरी ती साफ करावी अशी मागणी मनसेने केली असता पालिका प्रशासन कामाला लागली आहे. दोन जेसीबीच्या साह्याने झुडपं काढण्यात येत आहे.

मनीष नगर पासून रेल्वे क्रॉसिंग पर्यंत वाढलेली झुडपं काढावी अशी मागणी मनसेचे शिवराज पेचे, फाल्गुन गोहोकार, लकी सोमकुंवर, वैभव पुराणकर, सारंग चिंचोलकर, गुड्डू धोटे, सुरज खिरडकर, प्रगीत गौरकार, अविष्कार बोडे, स्वप्नील आवारी, तुषार बलकी, साहिल पारखी, चेतन चारलेकर यांनी केली होती.
वणी : बातमीदार