Home Breaking News त्या.. खनिजाचे उत्खनन आणि दळणवळण ‘घातक’

त्या.. खनिजाचे उत्खनन आणि दळणवळण ‘घातक’

1166

सभागृहात आमदार कडाडले
बाधीत शेतकऱ्यांना ‘वाचवा’ 

वणी उपविभागात विविध गौण खनिजांच्या खदानी आहेत. त्यांचे उत्खनन, दळणवळण, आणि होणारे धूलिकण प्रदूषण यामुळे परिसरातील शेतपिकांची उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. बाधीत शेतकऱ्यांना ‘वाचवा’ अन्यथा प्रचंड उद्रेक होईल असे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार सभागृहात कडाडले.

शासनस्तरावर शेतकऱ्यांचा कैवारीचं नसल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. औद्योगिकीकरण फायद्याचे की घातक हा विषय संशोधनाचा आहे. परंतु भूगर्भातील मौल्यवान गौण खनिजामुळे वणीची ओळख देशपातळीवर झालेली आहे.

केंद्र शासनाच्या अधिनस्त चालणाऱ्या कोळसा खाणी, त्यावर आधारित व्यवसाय आणि होणारे दळणवळण यामुळे वातावरणात वाढणारे प्रदूषण प्रचंड घातक आहेत. परीसरातील शेतपिकांची उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. त्यातच गौण खनिजाच्या खदानी प्रदूषणात भर टाकत आहेत.

गौण खनिजांच्या उत्खननाकरिता होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे धूलिकण प्रदूषणात वाढ होत आहे. खनिजप्राप्ती करिता ओलांडण्यात येणाऱ्या पातळीमुळे भूगर्भातील पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे शेतकऱ्यांची सिंचन सुविधा संपुष्टात आली आहे.

हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात आ. बोदकुरवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा बळीराजाचा निर्णय अखेरचा असेल हे सत्य नाकारता येत नाही.

प्रदूषणाबाबत “रोखठोक” ने उचलले पाऊल

मागील काही दिवसांपासून “रोखठोक”ने प्रदूषणाबाबत वृत्त मालिका प्रकाशित केली. रेल्वे सायडिंग, कोळसा डेपो, आणि होणारी खनिजांची वाहतूक यामुळे होणारे प्रदूषण, शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर होणारा परिणाम अधोरेखित केला होता. त्यातच PWD च्या जागेवर कोलडेपो धारकांनी केलेले अतिक्रमण आणि बेजबाबदार प्रशासन, कारवाईचा फार्स व  निव्वळ ढोंग यावर सुध्दा आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करावा व कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा
वणी: बातमीदार