Home वणी परिसर गरजू व्यक्तींना साहित्याचे वाटप

गरजू व्यक्तींना साहित्याचे वाटप

477
C1 20240404 14205351

हेल्पिंग हॅन्ड गृपचा स्तुत्य उपक्रम

वणी: लालगुडा येथील बिलिवर्स ईस्टर्न चर्च मध्ये परिसरातील गरजवंताला महत्वपूर्ण उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. गुरुवारी पारपडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार यांची उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस इझहार शेख, डाॅ. महेंद्र लोढा, राजाभाऊ पाथ्रडकर, निलेश परगंटीवार, सुधीर पेटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी परिसरातील गरजवंताला साहित्याचे वाटप करण्यात आले. अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिलांना शिलाई मशीन, शीतलहर बघता ब्लॅंकेट, जॅकेट, स्वेटर तर शालेय विध्यार्थ्यांना नोटबुक, वह्या या अत्यावश्यक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रोजेक्ट प्रेसिडेंट कृष्णमुर्ती कुळकर्णी बिलिवर्स ईस्टर्न चर्च लालगुडा यांनी केले . यावेळी बिलिवर्स ईस्टर्न चर्चचे सदस्य गंगा मंगलपवार मॅडम, पवन शंकावार सह मोठ्या संख्येत बिलिवर्स ईस्टर्न चर्चचे सदस्य उपस्थित होते.
वणी: बातमीदार