Home Breaking News नितीन उकनकर यांचेवर प्राणघातक हल्ला..!

नितीन उकनकर यांचेवर प्राणघातक हल्ला..!

4568
C1 20240404 14205351

उपचारार्थ चंद्रपूर ला हलवले

रोखठोक | येथील घुग्गुस मार्गावरील एका मदिरालया समोर काही अज्ञातानी नितीन उकनकर यांचेवर अचानक प्राणघातक हल्ला केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवार दि. 24 डिसेंबरला सायंकाळी घडली.

नितीन उकनकर (40) असे जखमीचे व्यक्तीचे नाव आहे, तो वणीतील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो घुग्गुस मार्गावरील साहिल बार आणि रेस्टॉरंट मध्ये गेला होता. काहीवेळ आपले कार्य पूर्ण करून तो बारच्या बाहेर आला असता अज्ञात युवकासोबत त्याचा वाद झाला.

त्या अज्ञात तरुणाने फोन करून आपल्या सवंगडयाना बोलावले. यावेळी वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि लाकडी दांड्याने नितीनच्या डोक्यावर मारहाण करण्यात आली. आणि लगेचच त्या युवकांनी तेथून पलायन केले, घडलेल्या घटनेमुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमी नितीन ला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. डोक्यावर झालेल्या जखमेवर टाके मारण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जखमीचे बायन घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
वणी : बातमीदार

Previous articleशांतीदेवी खुराणा यांचे निधन
Next article…त्या महिला पोलीसाचे केस पकडून खाली पाडले..!
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.