Home Breaking News आणि…..पंचायत समितीची ‘उमेद’ आगीत ‘खाक’

आणि…..पंचायत समितीची ‘उमेद’ आगीत ‘खाक’

2237
C1 20240404 14205351

बचतगटाचे महत्वपूर्ण कागद पत्र जळाले

वणी : पंचायत समितीच्या अधिनस्थ येत असलेल्या बचत गटाच्या महत्वपूर्ण कार्यालयाला शुक्रवार दि.25 फेब्रुवारी ला रात्री 9 वाजता भीषण आग लागली. यात पंचायत समितीची ‘उमेद’ खाक झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

पंचायत समितीच्या वतीने महिला सबलीकरण करण्यासाठी महिलांचे बचत गट चालवले जातात. या बचत गटांना उद्योग करण्यासाठी शासनाकडून कर्ज पुरविल्या जाते. त्यांची इत्यंभूत माहिती व दस्तऐवज ‘उमेद’ कार्यालयात संग्रहित करण्यात येते.

पंचायत समिती मधील शिक्षण विभागाच्या लगतच ‘उमेद’ चे कार्यालय आहे. या कार्यालयातून बचत गटाचा कारभार चालतो. शुक्रवारी रात्री 9 वाजताचे सुमारास या कार्यालयाला भीषण आग लागली.

काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज, संगणक व कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती संजय पिंपलशेंडे, गटविकास अधिकारी राजेश गायनार, गजानन विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उमेदचे कार्यालय असलेल्या इमारती लगतच पदपथावरील अनेक दुकाने आहेत. आग लागताच त्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. यावेळी एकच खळबळ माजली होती. यावेळी सभापती पिंपळशेंडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

पालिकेचे अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. उमेद च्या कार्यालयाला आग कशामुळे लागली हे कालांतराने स्पष्ट होणार असले तरी प्राथमिकदृष्ट्या शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वणी: बातमीदार