Home Breaking News तीन गुन्ह्याचा छडा, तीन आरोपी अटकेत

तीन गुन्ह्याचा छडा, तीन आरोपी अटकेत

1472

शिरपूर पोलिसांची कारवाई

वणी: शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील मेंढोली गावातील दोन दुकाने चोरट्याने लक्ष्य करत हजारो रुपयाचे किराना साहीत्य लंपास केले होते. तर वेळाबाई फाटा येथे उभा असलेल्या ट्रॅकच्या दोन बॅटरी चोरट्यानी लांबवल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा नोंद करून शिरपूर पोलिसांनी तपास सुरू करतचोरट्यांच्या मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मेंढोली येथील किराना दुकाणदार बंडु शंकरा उपलंचीवार यांचे किराणा दुकान आहे. दि 21 नोव्हेंबर ला मध्यरात्री चोरट्याने दुकान फोडून 14 हजार 370 रुपयांचे किराना साहीत्य सुपारी, तेल व रोख रक्कम लंपास केले. तर त्याच गावातील जितेंद्र राजेंद्र मेहता यांचे किराना दुकाण फोडुन 33 हजार 95 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यानी लांबवला होता.

चोरीच्या दोन्ही घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करण्याची पद्धत दोन्ही घटनेत सारखीच असल्याने ठाणेदार गजानन करेवाड यांनी गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती संकलित केली. तसेच मोबाईलचे तांत्रीक विश्लेषन करुन गुन्हयातील आरोपीला जेरबंद केले.

विकास उर्फ विक्रांत दशरथ मडावी (28) रा. मेढोली असे चोरट्याचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर वेळाबाई फाटा येथे उभा असलेल्या ट्रॅकच्या दोन बॅटरी चोरी गेल्याची तक्रार अजय विठठल निब्रड रा. कृष्णानपुर यांनी दिली होती. याप्रकरणी अवघ्या काही तासात नितीन रमेश ठावरी (26) रा. कृष्णानपूर व प्रविण भगवान कुमरे (28)रा. मोहदा या दोघांच्या मुसक्या अवळण्यात आल्या.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, प्रवीण गायकवाड, सुगत दिवेकर, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, अभीजीत कोषटवार, अमीत पाटील, चालक विजय फुलके यांनी केली.
वणी: बातमीदार