Home Breaking News वेकोली कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्‍यू

वेकोली कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्‍यू

3645
C1 20240404 14205351

कर्तव्‍यावर असतांना घडले अघटीत

रोखठोकः वेकोलीच्‍या कोलारपिंपरी कोळसा खाणीत कर्तव्‍यावर असलेल्‍या 57 वर्षीय कर्मचाऱ्यांचा ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याने (Heart attack) मृत्‍यू झाला. ही घटना शनिवार दि. 25 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता घडली.

भाऊराव सखाराम धोटे (57) असे मृतकांचे नांव आहे ते जैन लेआऊट परिसरात वास्‍तव्‍यास आहे. शनिवारी ते नेहमीप्रमाणे कोलार पिंपरी कोळसा खाणीत कर्तव्‍यावर गेले होते. अचानक त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटायला लागले. दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्‍यांचा ह्रदयविकाराच्‍या तिव्र झटक्‍याने मृत्‍यू झाला.

भाऊराव धोटे हे मनमिळावू स्‍वभावाचे होते, त्‍यांच्‍या अवेळी मृत्‍यूने परिवार व मिञ मंडळीत शोककळा पसरली आहे. त्‍यांचे पश्‍चात पत्‍नी, दोन मुली व एक मुलगा व मोठा आप्‍त स्‍वकीय परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )