Home Breaking News भाजपची भूमिका सावध, तर कॉग्रेसमध्‍ये संभ्रम

भाजपची भूमिका सावध, तर कॉग्रेसमध्‍ये संभ्रम

● गमावलेला गड पुन्‍हा मिळविण्‍याची रणनिती ● कॉग्रेस पक्षात एकवाक्‍यतेचा अभाव

2299
C1 20240225 12445210
C1 20240404 14205351

गमावलेला गड पुन्‍हा मिळविण्‍याची रणनिती
कॉग्रेस पक्षात एकवाक्‍यतेचा अभाव

Political News | अवघ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र अद्यापही चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात कॉग्रेसचा उमेदवार कोण असेल याबाबत संभ्रम आहे. त्‍यातच भाजपाचे नेते, पदाधिकारी, लोकसभा विस्‍तारक व कार्यकर्ते मतदारसंघ पिंजुन काढताहेत तर संभाव्य उमेदवारांबाबत सावध भूमिका घेताहेत. There is confusion about who will be the Congress candidate in Chandrapur-Wani-Arni Lok Sabha constituency.

भारतीय जनता पार्टीचे कॉग्रेसमुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍याचं स्‍वप्‍न केवळ चंद्रपुर लोकसभा मतदारसंघाने धुळीस मिळवलं होतं. पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले बाळु धानोरकर यांना ऐनवेळी कॉग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आणि भाजपाचा बालेकिल्‍ला ढासळला. गमावलेला गड पुन्‍हा मिळावा याकरीता भाजपा पक्षश्रेष्‍ठी अतिशय सावध भुमीका घेत असुन नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला होता. माञ त्‍यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले. यामुळे सहानुभूतीच्‍या लाटेचा फायदा उचलण्‍याकरीता आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरीता कॉग्रेस पक्षाचा एक गट आग्रही आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्‍या कन्‍या शिवानी वडेट्टीवार यांनी सुध्‍दा मतदारसंघात “भ्रमंती” सुरु केली आहे.

‘अबकी बार चारसौ पार’ म्हणत भाजपाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर महाराष्‍ट्रात 45 प्‍लस चे टार्गेट ठेवण्‍यात आल्‍याने एक-एक लोकसभा महत्‍वाची असणार आहे. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. भाजपला चंद्रपुर लोकसभेचा “गड” पुन्‍हा मिळवायचा असेल तर “ईलेक्‍टीव्‍ह मेरिट” उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार आहे.

चंद्रपुर लोकसभा निवडणुकीसाठी कॉग्रेस पक्षाकडून तब्‍बल दहा उमेदवार इच्‍छूक आहेत. यात प्रबळ दावेदार प्रतिभा बाळु धानोरकर असल्‍या तरी त्‍यांना शह देण्‍याकरीता शिवानी वडेट्टीवार यांचे नांव पुढे करण्‍यात येत आहे. कॉग्रेस पक्षांतर्गत एकवाक्‍यता नसल्‍याने विरोधकाला पराभूत करण्‍याची रणनिती आखण्‍यापेक्षा पक्षातील संभाव्‍य उमेदवाराला “फटाके” लावण्‍याचे काम कॉग्रेसी करतांना दिसत आहे.
Rokhthok News