Home Breaking News The burning car…. अघटित टळले, आलिशान कार पेटली

The burning car…. अघटित टळले, आलिशान कार पेटली

● पालिके लगतच्या वाहनतळा वरील घटना

1102
C1 20240404 14205351

पालिके लगतच्या वाहनतळा वरील घटना

रोखठोक | शहरातील गजबजलेल्या परिसरात पालिके लागत असलेल्या वाहन तळावर उभ्या आलिशान कारने अचानक पेट घेतला. ही बाब कळताच पार्किंगचे संचालक नईम अजीज यांनी कार मधील दोघांना खाली उतरवले यामुळे अघटित टळले. समयसूचकता बाळगत आग आटोक्यात आणली. ही घटना मंगळवार दि. 25 एप्रिल ला दुपारी डिड वाजता घडली. A luxury car parked at the parking lot suddenly caught fire.

येथील नगर परिषद कार्यालयाच्या लगतच पार्किंग झोन आहे. बाजारात अरुंद रस्ते व पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक वाहनतळावरच आपले वाहन उभे करतात. दुपारी दीड वाजताच्या दरम्यान कार क्रमांक MH-34-AA-7489 हे आलिशान कार पार्कींग झोन मध्ये आली.

सुधाकर गोवरदीपे राहणार उर्जानगर चंद्रपूर हे एक व्यक्ती सोबत वणीला आले होते. त्यांनी पालिकेजवळच्या पार्किंग मध्ये कार ठेवत असताना कारच्या बोनट मधून धूर येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यांनी वाहनातील व्यक्तींना तातडीने खाली उतरवले यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वणी: बातमीदार