Home क्राईम आणि त्‍या… ट्रकचालकांवर सदोष मनुष्‍यवधाचा ‘गुन्‍हा’

आणि त्‍या… ट्रकचालकांवर सदोष मनुष्‍यवधाचा ‘गुन्‍हा’

● दुचाकीस्‍वारांना ट्रकने चिरडल्‍याची घटना

1685

दुचाकीस्‍वारांना ट्रकने चिरडल्‍याची घटना

रोखठोक |Accident news | तालुक्‍यातील वांजरी येथे वास्‍तव्‍यास असणारे दोघे तरुण दुचाकीने वणीकडे जात असतांना विरुध्‍द दिशेने येत असलेल्या ट्रकने चिरडल्‍याची घटना 23 मार्च ला घडली होती. त्‍या ट्रक चालकाने जुन्‍या वादातुन हे कृत्‍य केल्‍याचा आरोप मृतकांच्‍या नातेवाईकांनी केल्‍यामुळे पोलीसांनी त्‍या ट्रक चालकांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद केला आहे.The relatives of the deceased alleged that the truck driver had committed this act due to an old dispute,

ट्रक व दुचाकीच्या अपघातात वांजरी येथे वास्‍तव्‍यास असलेला धीरज आत्राम (28) हा युवक घटनास्थळीच मृत्युमुखी पडला होता. तर संदीप सिडाम (32) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. संदीप चा उपचारादरम्‍यान 14 दिवसाने दि. 6 एप्रीलला मृत्‍यू झाला.

ट्रक व दुचाकीचा झालेला अपघात हा अनपेक्षीत नसुन घडवून आणलेले कृत्‍य होते अशी चर्चा गावात रंगत होती. कारण ट्रक चालक संजय आत्राम हा वांजरी येथील निवासी होता व त्याने मृतकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ट्रक चालक संजय आञाम व मृतक संदिप सिडाम यांचेत बऱ्याच दिवसापासुन वाद असल्‍याचे बोलल्‍या जाते. घटनेच्‍या दिवशी ट्रक चालक, ट्रक क्रमांक MH 29 BE 1816 ने वांजरी कडे जात होता तर दुचाकीने दोघे वणीकडे येत असतांना स्‍वर्णलीला शाळेच्‍या जवळच ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला.

या घटनेतील एकाचा घटनास्‍थळीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला होता. मृतकांच्‍या नातेवाईकांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन पोलीसांनी सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद केला आहे. परंतु या घडलेल्‍या अपघात प्रकरणी दाखल झालेल्‍या गुन्ह्यानंतर ट्रक चालकाला न्‍यायालयाने जामीन दिला होता.

पोलीसांनी नातेवाईकांच्‍या तक्रारीअंती आता वाढीव कलम 304 दाखल केल्‍यामुळे आरोपीला ताब्‍यात घेण्‍यासाठी न्‍यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी 2 मे ला न्‍यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार