Home वणी परिसर विकासकामांचा झंझावात,  दीड कोटीच्या कामाचे भुमीपुजन

विकासकामांचा झंझावात,  दीड कोटीच्या कामाचे भुमीपुजन

● अहेरअल्‍ली येथे पार पडला कार्यक्रम

1047
C1 20240404 14205351

अहेरअल्‍ली येथे पार पडला कार्यक्रम

Development News wani | अहेरअल्‍ली ग्रामपंचायतचे तरुण तडफदार सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आले असुन परिसरात तब्‍बल दीड कोटी चे विकासकामे होवू घातले आहे. याच विकासकामांचे विधानसभा मतदारसंघाचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार (sanjivreddy bodkurwar) यांचे हस्‍ते दि. 23 मे ला भुमीपुजन करण्‍यात आले.The follow-up by Sarpanch Hitesh alias Chhotu Raut has been successful and development works worth bhumipujan-of-work-worth-one-and-a-half-crores  have been accelerated in the area.

आयोजीत भुमीपुजन कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक अशोक रेड्डी बोदकुरवार, सुरेश मानकर,  खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष सुरेश बोलेनवार, सरपंच हितेश राऊत व उपसरपंच अनिल राऊत, तथा सर्व सदस्य ग्रां प . अहेर अल्ली, तंटामुक्त समिती अध्यक्ष दादाराव राऊत तसेच सचिव अतुल सिर्तावार, तलाठी संग्राम गिते मुख्याध्यापक शंकर केमेकार सह समस्त गावकरी तथा विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .

अहेरअल्ली येथे जल जीवन मीशन कार्यक्रम 2021–22 अंतर्गत 90. 52 लक्ष रुपयांची ग्रामीण पाणीपुरवठा योजना व जिल्हा परिषद बांधकाम विभागअंतर्गत अहेरअल्ली येथील 50 लक्ष रुपये किमतीचा जोड रस्ता या कामांना मंजुरी मिळाली आहे तर तांञीक बाबींची पुर्तता करण्‍यात आली आहे. यामुळे या महत्‍वपुर्ण योजनांचे भुमीपुजन आमदार बोदकुरवार यांचे हस्‍ते करण्‍यात आले.

“एकच ध्यास गावाचा विकास” असे ब्रिद अमलात आणणारे सरपंच हितेश राऊत यांनी प्रशासनाकडे केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे आणि आमदारांच्‍या विकासाभीमुख कार्यामुळे परिसरातील समस्‍या कायमस्‍वरुपी सुटतांना दिसत आहे. अहेरअल्‍ली गावाला विकासाकरीता प्राप्‍त झालेला निधी आणि होत असलेल्‍या कामांमुळे गावात आनंद व्‍यक्‍त होत आहे.
Rokhthok News