Home Breaking News Breaking…कोंबड बाजारावर धाड, तिघे अटकेत

Breaking…कोंबड बाजारावर धाड, तिघे अटकेत

1588
C1 20240404 14205351

दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

वणी | घुगूस मार्गावर असलेल्या बियर बार च्या मागे असलेल्या झुडपी जंगला कोंबड्याची झुंज सुरू होती. पोलिसांनी धाड टाकली असता तिघांना ताब्यात घेत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार दि. 25 सप्टेंबर ला दुपारी करण्यात आली.

वागदरा परिसरात असलेल्या बियर बारच्या मागील जंगलात कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळल्या जात होता. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. PSI शिवाजी टिपुर्णे व PSI प्रविण हीरे यांनी धाड टाकली असता तेथे जुगार सुरू होता.

दानिश शकील शेख (21), चेतन किशार राउत (25) हे दोघे रा.रंगनाथनगर, सादीक शेख अब्दुल वहाब (32), रा. शास्त्रीनगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे जवळून दोन कोंबडापक्षी, दोन लोखंडी धारदार काती, 3 मोटार सायकल व 7 हजार 720 रुपये रोकड असा एकूण 2 लाख 17 हजार 7290 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, SDPO संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. रामकृष्ण महल्ले यांचे आदेशावरून पोउपनि शिवाजी टिपुर्णे, पो.उप.नि.प्रविण हीरे यांनी केली
वणी: बातमीदार