Home क्राईम अपहरण…. पैशाची मागणी आणि आरोपी गजाआड

अपहरण…. पैशाची मागणी आणि आरोपी गजाआड

● शिरपुर पोलीसांची दणदणीत कारवाई

2559

शिरपुर पोलीसांची दणदणीत कारवाई

CRIME NEWS WANI | वाहन चालकाचे अपहरण करुन मोठया रकमेची मागणी त्‍याच्‍या मालकाला करण्‍यात आली. अपहरणकर्त्‍यांनी काही वेळाने वरोरा टोल नाक्‍याजवळ त्‍या अपहृत व्‍यक्‍तीला सोडले. पोलीसात तक्रार दाखल करताच शिरपुर पोलीसांनी राञी उशिरापर्यंत पाच आरोपींना शिताफीने जेरबंद केले. ही घटना रविवार दिनांक 24 सप्‍टेंबरला दुपारी एक वाजताच्‍या दरम्‍यान घडली. Kidnapping the driver and demanding a large amount of money

महताब शहाबुद्दीन अन्‍सारी (24) असे अपहरण करण्‍यात आलेल्‍या वाहन चालकांचे नांव आहे तो झारखंड येथील निवासी असल्‍याचे कळते. तो  ट्रक ट्रेलर क्रमांक MH- 16- CV- 3208 मधुन पोकलेन मशिन घेवुन अहमदनगर येथुन मोहदा येथे आला होता.

पोकलेन मशिनची डिलीव्‍हरी मोहदा येथील गिटटी क्रेशर मालकाला दिली. नंतर तो आपल्‍या ट्रेलर वाहनाने गावी परतत असतांना वेळाबाई फाटयाजवळ चार ते पाच व्‍यक्‍तींनी त्‍याला वाहनासह अडवले. यावेळी महताब ला बेदम मारहाण करण्‍यात आली आणि त्‍याचे अपहरण करण्‍यात आले.

अपहरण कर्त्‍यांनी ट्रेलर चालकाच्‍या मालकाला मोबाईल वरुन फोन करुन मोठया रकमेची मागणी केली. तसेच पैसे दिल्‍या शिवाय वाहन चालकाला सोडणार नाही अशी धमकी देण्‍यात आली. तसेच वाहन वरोरा मार्गाकडे भरधाव हाकण्‍यात येत होते. वरोरा मार्गावरील शेबळ टोल नाक्‍याजवळ अपहरणकर्त्‍यांनी वाहन चालकाला सोडून दिले व पोबारा केला.

घाबरलेल्‍या ट्रेलर चालकांने थेट शिरपुर पोलीस ठाणे गाठून ठाणेदार API संजय राठोड यांना आपबिती कथन केली. घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्‍काळ गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आणि तपासयंञणा कार्यान्वित करण्‍यात आली. परिस्थितीजन्‍य आकलन, तांञीक बाबीचा अवलंब करत आरोपींचा शोध घेण्‍यासाठी पोलीस सरसावले. राञी उशिरा पर्यंत आरोपींना पाटनबोरी व भद्रावती वरुन ताब्‍यात घेण्‍यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,  अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ठाणेदार API संजय राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
Rokhthok News