Home वणी परिसर भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर

भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर

● वणी विधानसभेत सेवा पंधरवाडा

178

वणी विधानसभेत सेवा पंधरवाडा

Wani News | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पं. दीनदयाल उपाध्याय व वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 25 सप्टेंबरला वणी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. Seva fortnight from 17th September to 2nd October on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday

येथील बाजोरिया हॉल मध्ये दि. 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजतापासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजे पर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे. त्यासोबत या ठिकाणी पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात येणार आहे.

दि. 25 सप्टेंबरलाच प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल तपासणी, गरोदर माता तपासणी, टी. बी. ,कुष्ठरोग तपासणी, लिव्हर, किडनी, कॅन्सर तपासणी, डेंगू, मलेरिया व इतर आरोग्य तपासणी होणार आहे.

दि. 29 सप्टेंबरला घोन्सा येथे गजानन महाराज देवस्थान येथे त्याच दिवशी शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर होणार आहे. या संधीचा वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.
Rokhthok News