Home Breaking News उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली, युवक जागीच ठार

उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली, युवक जागीच ठार

3975

कायर परिसरातील घटना

रोखठोक |- मुकुटबन येथून आपले कर्तव्य पार पाडून गावी जात असलेल्या युवकाचा भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

पवन गोवारदीपे (25) रा गोडगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मुकुटबन येथील एका कंपनीत कामाला होता. दि 24 डिसेंबर ला आपले कर्तव्य करून आपल्या दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाला होता.

कायर गावाजवळ नादुरुस्त असलेला ट्रक उभा होता. अंधारामुळे पवन ला उभे असलेले वाहन दिसले नाही आणि भरधाव दुचाकी उभ्या ट्रक वर आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वणी : बातमीदार

Previous article…त्या महिला पोलीसाचे केस पकडून खाली पाडले..!
Next articleकोंबड बाजारावर धाड, सहा अटकेत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.