Home Breaking News मारोतराव भारती यांचे निधन

मारोतराव भारती यांचे निधन

260
C1 20240404 14205351

रोखठोक | यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मारोतराव भारती यांचे आज 88 व्या वर्षी दि. 25 डिसेंबर ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कार्याचा आणि गाव विकासासाठी झटण्याचा त्यांचा स्थायीभाव ग्रामस्थ कदापीही विसरू शकणार नाही.

यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे वास्तव्यास असलेले मारोतराव भारती हे तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होते. त्यांनी अनेक वर्षे सरपंच म्हणून गावगाड्याच्या विकास केलेला आहे. गावातील मूलभूत समस्याचे निराकरण त्यांनी केले आहे. गरिबांचा कैवारी म्हणून ओळख मिळवणारे जेष्ठ व्यक्तिमत्त्व आज ग्रामस्थांना सोडून गेले आहेत.

त्यांच्यावर उद्या दि. 26 डिसेंबर ला बेलोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्त स्वकीय परिवार आहे. त्यांच्या निधनाने बेलोरा येथील एक भारदस्त व्यक्तिमत्त्व लयास गेल्याचे दुःख सदोदित असणार आहे.
वणी : बातमीदार

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)