Home Breaking News धक्कादायक… ती चिमुरडी वाहनाच्या चाकाखाली आली आणि…

धक्कादायक… ती चिमुरडी वाहनाच्या चाकाखाली आली आणि…

● कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ● दुर्दैवी घटनेने पसरली शोककळा

2948
C1 20231225 20065366
C1 20240404 14205351

कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
दुर्दैवी घटनेने पसरली शोककळा

Sad News Wani : अवघ्या दोन वर्षांची चिमुरडी खेळत, बागडत असताना अचानक दुर्दैवी घटना घडावी. यापेक्षा परिवारासाठी दुःखद काय असणार. शुक्रवारी घराबाहेर खेळत असलेली चिमुरडी रिव्हर्स घेत असलेल्या बोलेरो वाहनांच्या मागील चाकाखाली आली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि दुःखद घटना घडली. कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश व पसरलेली शोककळा नांदेपेरा येथे बघायला मिळाली. A two-year-old girl was playing and gardening when an unfortunate incident happened. What can be more tragic for the family.

देविका प्रकाश केमेकर (2) असे दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. ती आपल्या साडेतीन वर्षीय मोठया भावासोबत घराच्या बाहेर खेळत होती. त्याचवेळी गावातीलच प्रज्वल प्रमोद कोल्हे हा आपले महिंद्रा बोलरे मालवाहू वाहन MH-29 -T-6753 रिवर्स घेत होता.

बोलेरो वाहन चालक आपले वाहन मागे घेत असताना बेजबाबदार पणे वागल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आजूबाजूला कोण आहेत हे बघितल्यानंतरच वाहन मागे-पुढे करणे आवश्यक होते. मात्र अनर्थ घडलाच ‘देविका’ मागील चाकात आली. ती गंभीर जखमी झाली तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी देविकाला मृत घोषित केले आणि तिच्या आई- वडिलांच्या एकच हंबरडा फोडला. सतत हसत-खेळत असलेली चिमुकली जग सोडून गेल्याने संपूर्ण परिवाराला कमालीचा मानसिक धक्का बसला. अखेर मृतक देविकाच्या काकाने सोमवारी वणी पोलीस ठाणे गाठत रीतसर तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या प्रज्ज्वल कोल्हे याच्या विरुद्ध भांदविच्या कलम 279, 304 अ, 134 (अ), 134 (ब) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
Rokhthok News