Home Breaking News भीषण: ट्रकने दुचाकीला उडवले, एक ठार

भीषण: ट्रकने दुचाकीला उडवले, एक ठार

● अंत्‍यसंस्‍कार करुन परततांना घडली घटना

2418
Image Search 1703504205391

अंत्‍यसंस्‍कार करुन परततांना घडली घटना

Accident News Wani : वणी वरून शिंदोला मार्गे पाथरी येथे दुचाकीने जात असलेल्‍या 55 वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या दुचाकीला सिमेंटची वाहतुक करणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना शनिवार दिनांक 23 डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास घडली. A 55-year-old man’s bike was hit by a speeding cement truck.

गजानन मोहन हिंगाने (55) असे मृतकांचे नांव आहे. ते मुळचे लहान पांढरकवडा येथील रहिवासी असुन मागील काही वर्षापासुन सासुरवाडी असलेल्‍या पाथरी येथे आपल्‍या परिवारांसह वास्‍तव्‍यास आहेत. घटनेच्‍या दिवशी राळेगांव येथील आपल्‍या नातेवाईकांच्‍या अंत्‍यसंस्‍काराकरीता ते आपल्‍या दुचाकीने गेले होते.

राळेगांव येथील अंत्‍यसंस्‍कार आटोपताच गजानन हे आपल्‍या दुचाकी क्रमांक MH -29 -AC- 8023 ने एकटेच आपल्‍या गावी जाण्‍यास निघाले. दुपारी शिंदोला पोहचताच वणीकडे सिमेंटची वाहतुक करणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH-29-BE-4495 ने दुचाकीला उडवले. या घटनेत गजाननच्‍या डोक्‍याला जबर दुखापत झाली.

अपघात घडताच जमलेल्‍या स्‍थानिक नागरीकांतील त्‍यांच्‍या नातेवाईकाने त्‍यांना रुग्‍णवाहिकेतुन तातडीने चंद्रपुरला रुग्‍णांलयात हलवले. परंतु डॉक्‍टरांनी तपासणी केली असता त्‍यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मृतकांचे भाऊ गणेश मोहन हिंगाने यांनी शिरपुर पोलीसात तक्रार दाखल केली असुन ट्रकचालकां विरुध्‍द गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.
Rokhthok News