Home Breaking News attack…मनमिळाऊ व्यवसायिकाची “एक्झिट”

attack…मनमिळाऊ व्यवसायिकाची “एक्झिट”

● शिंदोला परिसरात पसरली शोककळा

2190
C1 20240404 14205351

शिंदोला परिसरात पसरली शोककळा

Sad News | तालुक्यातील शिंदोला येथे वास्तव्यास असलेल्या 53 वर्षीय व्यवसायिकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही शोकाकुल घटना सोमवार दि. 26 जूनला सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. त्यांच्या अनपेक्षित “एक्झिट” ने परिसरात शोककळा पसरली आहे. A 53-year-old businessman residing in Shindola died of a heart attack.

सुधाकर कृष्णाजी बदखल (53) असे व्यवसायिकाचे नाव आहे. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यांनी अल्पकाळात व्यवसायात मोठी मजल मारली होती. सायंकाळी त्यांची अचानक प्रकृती बिघडली, त्यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर ला ‘रेफर’ केले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

सुधाकर बदखल यांच्या निधनाची वार्ता कळताच शिंदोला परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांची अकस्मात “एक्झिट” (exit) अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा प्रणय, पत्नी संगीता, मुलगी पूजा असा आप्त परिवार आहे. दि. 27 जूनला शिंदोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Rokhthok News