Home वणी परिसर अजित जाधव वणीचे नवे ‘ठाणेदार’

अजित जाधव वणीचे नवे ‘ठाणेदार’

● अवैद्य धंद्यावर आळा बसविण्याचे आव्हान

1775

अवैद्य धंद्यावर आळा बसविण्याचे आव्हान

Police News Wani | परिक्षेत्रीय पोलीस आस्‍थापना मंडळाने जिल्ह्यातील कालावधी पुर्ण झालेल्‍या पोलीस निरीक्षकांच्‍या बदलीचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे वणीचे ठाणेदार प्रदिप शिरस्‍कर यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्‍यांच्‍या रिक्‍त जागी मुकूटबन येथे कार्यरत अजित बाळकृष्‍ण जाधव यांची वणी ठाणेदार पदी वर्णी लागली आहे. Ajit Balkrishna Jadhav, working at Mukutban, has been posted as Wani PSO.

जिल्ह्यातील महत्‍वपुर्ण पोलीस ठाणे म्‍हणुन संपुर्ण राज्‍यात वणीची ओळख अधोरेखीत झाली आहे. वणी ठाण्‍याचा कार्यभार मिळावा म्‍हणुन अनेक अधिकारी धडपडत असतात. जिल्ह्यात नव्‍याने आलेल्‍या अधिकाऱ्यांपैकी कोणाचीतरी वर्णी लागेल असे बोलल्‍या जात होते. परंतु जिल्हा पोलीस आस्‍थापना मंडळाच्‍या बैठकीत एकमताने निर्णय घेत अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्‍तव बदल्या करण्यात आल्या आहेत.

अजित जाधव यांनी उपविभागातील मुकूटबन येथे योग्‍यरित्‍या काम पाहीले आहे. तसेच त्‍यांना परिसराची चांगलीच जाण आहे, त्‍यामुळे वणी ठाणे सांभाळतांना त्‍यांना अडचण जाणार नाही माञ अवैदय धंदे फोफावणार नाही यांची खबरदारी घ्‍यावी लागणार आहे. कोंबड बाजार, गोवंश तस्‍करी, मटका जुगार, भंगार चोरी, सुगंधीत तंबाखुची होणारी आयात याचे समुळ उच्‍चाटन करावे लागणार आहे.
Rokhthok News

Previous articleदहशत….येनक शिवारात वाघाचा ‘वावर’
Next articleattack…मनमिळाऊ व्यवसायिकाची “एक्झिट”
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.