Home वणी परिसर मोफत…नेञ चिकित्‍सा व मोती बिंदू शस्‍ञक्रिया

मोफत…नेञ चिकित्‍सा व मोती बिंदू शस्‍ञक्रिया

● सुवर्णसंधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन

607

सुवर्णसंधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन

Wani News | भाजपा नेते व सामाजीक कार्यकर्ते विजयबाबु चोरडीया यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन गुरुवारी भव्‍य नेञ चिकित्‍सा व मोती बिंदू शस्‍ञक्रियाचे आयोजन करण्‍यात आले आहे. धवल नेञालय नागपुर यांच्‍या सहकार्याने आयोजीत शिबीर सुविधा मंगल कार्यालय मारेगांव येथे पार पडणार असुन गरजु लाभार्थ्‍यांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन करण्‍यात आले आहे. On the occasion of the birthday of BJP leader and social activist Vijaybabu Chordia.

जय श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी समितीच्‍या विद्यमाने भाजपा नेते व सामाजिक कार्यकर्ते विजयबाबु चोरडीया यांचा वाढदिवस दि. 4 सप्‍टेंबरला उत्‍साहात साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. दिनांक 31 ऑगष्‍टला मोफत नेञ चि‍कित्‍सा व मोती बिंदु शस्‍ञक्रिया शिबीर 10 ते 4 या वेळेत घेण्‍यात येणार आहे.

या शिबीराचे आयोजन जय श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी समिती, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद व आदर्श महिला बहुउददेशीय संस्‍था यांचे वतीने करण्‍यात आले आहे. या शिबीरात मोफत मोती बिंदु शस्‍ञक्रिया करण्‍यात येणार असुन औषधी सुध्‍दा निशुल्‍क असणार आहे. तसेच नोंदणी न झालेल्‍या रुग्‍णांची वेळेवर नोंदणी करुन तपासणी करण्‍यात येणार आहे.

नोंदणी करीता संपर्क
पंकज पिदुरकर 9689411525, सौरभ पोटफोडे 7822852794, चेतन मोते 7770046190, अनिकेत चोपणे 8308006463,  निखिल कोरडे 9309504083, रोहन पारखी 9823317959, अनुप महाकालकर 7972125196, प्रणय जिडडेवार 9325833513, अविनाश राउत 8767745270,  प्रतिभा तातेड 992338981, बेबीताई आञाम 7721950537, शुभांगी कुक्‍कुलवार 9588670818,  मनिषा मोहुर्ले 8821983579, सुचिञा जंगले 7798308946