Home Breaking News नवरात्रोत्सव…. ‘माताराणी’चे आगमन “धुमधडाक्यात”

नवरात्रोत्सव…. ‘माताराणी’चे आगमन “धुमधडाक्यात”

109

● पारंपरिक वाद्य आणि ढोलताशांचा गजर

वणी: ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत माताराणी चे आगमन झाले. शहरात माँ दुर्गेच्या स्वागतासाठी वणीकर सज्ज होते. शहरात विविध ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक मंडळाने वाजतगाजत ‘माताराणी’ची प्रतिष्ठापना केली आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri)  साजरी केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. शारदीय उत्सव देवी शक्ती माँ दुर्गाला (Goddess Durga)  समर्पित आहे. या दरम्यान भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि वेगवेगळ्या दिवशी दुर्गा देवीच्या नवीन रूपांची पूजा करतात.

वणी शहरात तब्बल 102 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ आहेत. प्रत्येक मंडळांनी मताराणीचे आगमन उत्साहात साजरे केले आहेत. पारंपरिक वाद्य, कडाडणारे ढोलताशे, गुलालांची उधळण, जय माता दी चा गजर आणि संचारलेला उत्साह अदभुत होता.

दुर्गोत्सवासाठी वणी शहर नटले असून विद्युत रोषणाई आणि देखाव्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सण उत्सव भक्तिभावाने साजरा व्हावा याकरिता सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ काटेकोरपणे कटिबद्ध असले तरी पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून आहेत.
वणी: बातमीदार