Home Breaking News नवसाला पावणारा बाबापुरचा “बाप्‍पा”

नवसाला पावणारा बाबापुरचा “बाप्‍पा”

● हजारो भाविक भक्‍तांची मांदियाळी

1231

हजारो भाविक भक्‍तांची मांदियाळी

 

Wani News | तालुक्‍यातील बाबापुरचा बाप्‍पा नवसाला पावतो अशी ओळख पंचक्रोशीत निर्माण झाली आहे. गणेश चतुर्थी पासुन अनंत चतुर्दशी पर्यंत लाखो भक्‍तांची मांदियाळी बघायला मिळते. दिवसभर चालणारा महाप्रसाद, मनोभावे भक्‍तांची होत असलेली वर्दळ, लहानशा गावाला पावन करतांना दिसत आहे. From Ganesh Chaturthi to Anant Chaturdashi, lakhs of devotees can see ‘bappa’

तालुक्‍यातील बाबापुर हे लहानशे गांव प्रचंड प्रकाशझोतात आलेले आहे. दहा दिवस तेथे असणारा जल्लोष अवर्णनीय आहे. परिसरातील भाविक भक्‍तांची लागणारी रिघ आणि लगतच्‍या राज्‍यातुन येणारे भाविक भक्‍त यामुळे बाबापुर यागावाला जञेचे स्‍वरुप आलेले आहे. नवसाला पावणारा बाप्‍पा असा मान मिळाल्‍यामुळे बाबापुर तिर्थक्षेञ झाले आहे.

बाबापुर गाव दहा दिवस दिव्यांच्या सजावटीने लखलखत असते. संपुर्ण दहा दिवस गावातील नागरीकांत उत्‍साह संचारलेला असतो. सर्वच आपापल्या परिने भाविक भक्‍तांची सेवा करतांना दिसतात. उत्‍सव निर्विघ्‍न पार पडावा याकरीता सर्व गाव झटतांना दिसत आहे.

बाबापुर येथील बाप्‍पाची ख्‍याती सर्वदुर पसरली आहे. अतिशय सुंदर रेखीव बाप्‍पाची मुर्ती डोळयाचे पारणे फेडणारी आहे. भक्‍तांना शिस्‍तबध्‍द पध्‍दतीने मिळणारे दर्शन आणि दिवसभर चालणाऱ्या जेवणावळी भक्‍तांना संतुष्‍ट करताहेत. बाबापुर गावात संचारलेली भाविक भक्‍तांची गर्दी व होत असलेल्‍या वाहतुकीला सांभाळण्‍यासाठी शिरपुरचे ठाणेदार संजय राठोड,  PSI रामेश्‍वर कांदुरे, राजु बागेश्‍वर, अनिल सुरपाम व होमगार्ड सज्‍ज आहेत.

बाप्‍पाची स्‍थापना 105 वर्षापुर्वी

राज्‍यात 105 वर्षापुर्वी प्‍लेगने हाहाकार माजवला होता, सर्वञ पसरलेली साथ यामध्‍ये होणारे मृत्‍यू यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले होते. ही माहामारी बाबापुर मध्‍ये सुध्‍दा आलेली होती. त्‍यावेळी एका दाम्‍पत्‍यांने बाप्‍पांची स्‍थापना करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला आणि आश्‍चर्य, माहामारी संपुष्‍ठात आली तेव्‍हापासुन गणेशजींची स्‍थापना केली जात असल्‍याचे बोलल्‍या जाते.

ROKHTHOK NEWS