Home Breaking News पोलिसांनी कोंबड बाजार उधळला, पाच अटकेत

पोलिसांनी कोंबड बाजार उधळला, पाच अटकेत

● लाठी व पिंपरी शिवारात धाडसत्र

2864
C1 20231126 16035175
C1 20240404 14205351

लाठी व पिंपरी शिवारात धाडसत्र

Wani News | उप विभागात कोंबड बाजाराला उधाण आले आहे. मुकुटबण हद्दीतील घोंसा शिवारात बिनधास्त चालणारा कोंबड बाजार पोलिसांना दिसत नाही तर शिरपूर पोलिसांनी मात्र लाठी व पिंपरी शिवारात धाडसत्र अवलंबत होऊ घातलेला कोंबड बाजार उधळला असून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. Lathi and Pimpri Shiwar, the kombad bazar, which was about to be launched, collapsed

दिपक वारलू तेलंग (25) रा. बेसा, सुरेद्र किसन पिंपळकर (38) रा. चिखली या जुगाऱ्यांना लाठी शेत शिवारातून ताब्यात घेतले तर शालीक नामदेव तुरणकार (38), संतोष तुकाराम टेकाम (35) व जावेद कालु शेख (51) तिघेही राहणार नेरड (पु) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उपविभागात कोंबड बाजाराला खुलेआम सूट दिली की काय असे वाटायला लागले आहे. मुकूटबण पोलिसांच्या हद्दीत येत असलेल्या घोंसा परिसरातील झरी मार्गावरील दहेगाव शिवारातील जंगलव्याप्त भागात शुक्रवारी व आज रविवारी कोंबड बाजाराची जत्रा स्थानिकांना अनुभवायला मिळाली आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाठी व पिंपरी शिवारात कोंबड बाजार चालवायचा बेत जुगाऱ्यानी आखला होता. याची गोपनीय माहिती ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. लगेचच दोन पथक तयार करून दोन्ही ठिकाणी धाड सत्र अवलंबले.

या कारवाईत दोन्ही ठिकाणावरून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर कोंबड बाजारासाठी लागणारे साहित्य व झुंजी करिता वापरण्यात येणारे मृत कोंबडे जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Previous articleशिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचे पडघम
Next articleलक्ष्मणराव गंधारे यांचे निधन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.