Home Breaking News धक्कादायक….सहा वर्षाच्या बालकावर फेकले आम्लद्रव

धक्कादायक….सहा वर्षाच्या बालकावर फेकले आम्लद्रव

1732

शहराच्या मध्यवस्तीत घटना

वणी :-सहा वर्षीय मुलगा घराजवळ खेळत असतांना एका विकृत मानसिकतेचा अज्ञात इसमाने त्याचे वर आम्लद्रव (बॅटरी मधील पाणी)फेकल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी 5:45 वाजताचे दरम्यान घडली आहे.

उजेब खा शफीउल्ला खा वय 6 वर्ष राहणार मोमीनपुरा असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.हा बालक सायंकाळ च्या सुमारास घरा शेजारी खेळत होता.तेवढ्यात तिथे आलेल्या एका अज्ञात इसमाने त्याचे अंगावर आम्लद्रव(बॅटरी मधील पाणी)फेकून पळ काढला.

दि 25 डिसेंबर ला या मुलांची लहान बहिणीवर देखील अश्याच प्रकारे द्रव फेकण्यात आले होते.त्यावेळी पालकांनी पोलिसात तक्रार दिली नाही.मात्र परत असा प्रकार झाल्याने हादरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले आणि या घटनेची तक्रार दाखल केली आहे.वृत्त लिहे पर्यंत गुन्हा नोंद झालेला नाही.सुदैवाने बालकाला गंभीर दुखापत झाली नाही.
वणी : बातमीदार