Home वणी परिसर APMC election…..बाजार समितीची रणधुमाळी अंतीम टप्‍प्‍यात

APMC election…..बाजार समितीची रणधुमाळी अंतीम टप्‍प्‍यात

● एक हजार 855 मतदारांच्‍या हाती सत्‍तेची चाबी

791

एक हजार 855 मतदारांच्‍या हाती सत्‍तेची चाबी

APMC election : रोखठोक | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणुक अंतीम टप्‍प्‍यात पोहचली आहे. 18 जागे करीता दोन पॅनलचे 36 तर दोघे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. आजी – माजी आमदारांच्‍या दोन गटात तुल्‍यबळ लढत होणार आहे. या निवडणुकीत एक हजार 855 मतदारांच्‍या हाती सत्‍तेची चाबी असल्‍याने पारडे सत्‍ता केंद्रीत गटाकडे झुकणार का ? हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे. The election of the Agricultural Produce Market Committee has reached its final stage.

बाजार समितीच्‍या निवडणुकीत मावळत्‍या संचालक मंडळातील काही उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. भाजपा शिवसेना (शिंदे गट) युतीचे “शेतकरी एकता पॅनल” व महाविकास आ‍घाडीचे “शेतकरी परिवर्तन पॅनल” यांच्‍यात थेट लढत होणार आहे. परंतु भाजपाने शिवसेना (शिंदे गट) व महाविकास आघाडीने राष्‍ट्रवादीला वाऱ्यावर सोडल्‍याचे दिसत असुन या दोन्‍ही पक्षाचा एकही उमेदवार निवडणुक रिंगणात नाही.

बाजार समितीच्‍या निवडणुकीतील खरी चुरस सहकारी संस्‍था गटातील 11 जागे करीता निवडणुक रिंगणात असलेल्‍या 22 उमेदवारांतच आहे. 68 सहकारी संस्‍थामधून 845 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहे. व्‍यापारी मतदारसंघात दोन जागेकरीता चौघे रिंगणात असुन 125 मतदार मतदानाचा हक्‍क बजावतील. हमाल व तोलारी गटात एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात असुन 89 मतदार आहेत तर ग्राम पंचायतच्‍या चार जागेकरीता आठ उमेदवार उभे ठाकले असुन 793 मतदार आपल्‍या पसंतीचा उमेदवार निवडणार आहे.

बाजार समितीच्‍या निवडणुकीत भाजपाचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व बॅकेचे माजी अध्‍यक्ष विनायक एकरे यांचा शेतकरी एकता पॅनल गट सर्व ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. तर कॉग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्‍हाप्रमुख विश्‍वास नांदेकर व बॅकेचे विद्यमान अध्‍यक्ष टिकाराम कोंगरे हे शेतकरी परिवर्तन पॅनलच्‍या माध्‍यमातुन निवडणुकीची खिंड लढवताहेत.

बाजार समितीच्‍या निवडणुकीची उत्‍कंठा शिगेला पोहचली आहे. तालुक्‍यातील शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या गटाला विजयाची आशा आहे. धुरंधर नेत्‍यांचे सहकारातील वर्चस्‍व या निवडणुकीनंतर उजागर होणार आहे. प्रचार यंञणा अखेरच्‍या टप्‍यात असल्‍याने मतदारांपर्यत पोहचणाऱ्या गटाची सरशी होणार असे चिञ निर्माण झाले आहे. बाजार समितीच्‍या या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणुन सुनील भालेराव व सहायक निवडणूक अधिकारी मनोज पिसाळकर व इतर कर्मचारी काम पहात आहे.
वणी: बातमीदार