Home Breaking News पालीकेच्‍या घंटागाडीला लागली ‘आग’

पालीकेच्‍या घंटागाडीला लागली ‘आग’

● घुग्‍गूस मार्गावरील घटना

964

घुग्‍गूस मार्गावरील घटना

Wani News : शहरातील कचरा संकलीत करुन डपिंग ग्राउंडवर जाण्‍यासाठी निघालेल्‍या घंटागाडीला घुग्‍गूस मार्गावरील हॉटेल जन्‍नत समोर अचानक आग लागली. वाहनचालकाच्‍या लक्षात ही बाब येताच त्‍यांने व अन्‍य स्‍थानिक नागरीकांनी आग विझवली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. Ghantagadi suddenly caught fire in front of Hotel Jannat on Ghuggoos Road.

घन कचरा व्‍यवस्‍थापण अंतर्गत पालीकेच्‍या वतीने शहरातील प्रत्‍येक प्रभागात घंटागाडीच्‍या माध्‍यमातुन ओला व सुका कचरा संकलीत करण्‍यात येते. रविवारी कचरा भरलेली घंटागाडी खाली करण्‍यासाठी जात असतांना वाहनात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.

धुर निघत असल्‍याचे वाहन चालकांच्‍या निदर्शनांस आले. यामुळे त्‍यांने लगेचच वाहन बाजुला लावत आग विझवण्‍याचा प्रयत्‍न केला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनाला लागलेली आग विझवण्‍यात आल्‍याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
Rokhthok News