Home क्राईम गोवंश तस्करी… चौघे अटकेत, सहा बैलांची सुटका

गोवंश तस्करी… चौघे अटकेत, सहा बैलांची सुटका

● अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

989
C1 20240404 14205351

अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wani News : वरोरा- वणी मार्गावरून दोन वाहनातून गोवंश तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदारांना मिळाली. झोला या गावाजवळ शनिवारी रात्री पोलिसांनी सापळा रचला. दोन वाहनात सहा बैल कोंबून नेत असल्याचे आढळून आले असून चौघांना ताब्यात घेत सहा बैलाची सुटका करण्यात आली. तर 11 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Police laid a trap on Saturday night. It was found that six bullocks were being transported in two vehicles

सचिन धनराज वैद्य (32) रा. अभ्यंकर वार्ड,आकोट तालुका पवनी जि.भंडारा, अमोल दिनेश्वर घुमे (23) रा. आंबेडकर वार्ड,पवनी जि.भंडारा, राजहंस आत्माराम नागपुरे (41) रा.नेहरू वार्ड,पोस्ट चिंचाळ ता.पवनी जि.भंडारा व गणेश किरण शेलोकर (20) रा. नेहरू वार्ड, चींचाळ ता.पवनी जि.भंडारा असे अटकेतील गोवंश तस्करांची नावे आहेत.

वणी उप विभागातील महामार्गावरून तेलंगाणा किंवा आंध्रप्रदेशात मोठ्याप्रमाणात गोवंश तस्करी केल्याजाते. नागपूर, गोंदिया, भंडारा आदी ठिकाणावरून गोवंश वाहनात कोंबून नेल्या जाते. गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी झोला फाटा येथे संशयित वाहनांची तपासणी केली असता निर्दयपणे कोंबलेले सहा बैल दिसून आले.

पोलिसांनी वाहन क्रमांक MH 34 BG 4064 व MH-36 AA 0972 च्या चालक व क्लिनर असे चौघांना ताब्यात घेत विचारणा केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचेवर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1), (D)11(1)(e), 11(1)(h) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला तर 1 लाख वीस हजार रुपये किमतीचे सहा बैल व 10 लाख रुपये किमतीचे दोन वाहने ताब्यात घेतली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशानुसार ASI प्रभाकर कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
Rokhthok News