Home Breaking News चोरट्यांनेच ‘सुविधा’ कापडकेंद्राला आग लावली..! 10 लाखाची रोकड लंपास, करोडोचा माल...

चोरट्यांनेच ‘सुविधा’ कापडकेंद्राला आग लावली..! 10 लाखाची रोकड लंपास, करोडोचा माल भस्मसात

8249
C1 20240404 14205351

शहरात चोरांडे झालेत शिरजोर

वणी : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले प्रसिद्ध सुविधा कापड केंद्र चोरट्यांनी लक्ष केले.  गल्ल्यातील 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली व दोरीच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरून पलायन करत दुकानाला आग लावल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

गांधी चौकातील मुख्य बाजार पेठेत प्रवीण गुंडावार यांचे सुविधा कापड केंद्र आहे. रात्री दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांने गल्ल्यातील रोकड ताब्यात घेतली आणि कापडाच्या साह्याने त्याने पुन्हा तिसऱ्या मजल्यावरूनच पलायन केले.

सुविधा कापड केंद्रात बरेचसे कामगार काम करतात, तसेच सतत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते याचा फायदा घेत चोरटा दुकान बंद करण्यापूर्वीच दडून बसल्याचे बोलल्या जात आहे. कारण तिसऱ्या मजल्यावरील शटर चे लॉक आतून लावण्यात आले होते तेच तोडण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून तपास योग्यदिशेने सुरू आहे.

पलायन करण्यापूर्वी चोरट्याने दुकानाला आग लावली हे महत्वाचे असून कोणताही पुरावा मागे राहू नये असा त्याचा उद्देश होता. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले यामुळे दुकान पुर्णतः बेचिराख झाले आहे. परंतु अशा प्रकारे चोरी करण्याची कार्यपद्धती नेमकी कोणाची हे पोलिसांना शोधावे लागणार आहे.
वणी बातमीदार