Home Breaking News जळीतकांड….’अंकीता’च्‍या परिवाराला आर्थिक मदत

जळीतकांड….’अंकीता’च्‍या परिवाराला आर्थिक मदत

● ठाकरेंचा शब्‍द फडणवीसांनी केला पुर्ण ● चित्रा वाघ यांनी मांडले "रोखठोक" मत

862

ठाकरेंचा शब्‍द फडणवीसांनी केला पुर्ण
चित्रा वाघ यांनी मांडले “रोखठोक” मत

DCM NEWS | समाजमन सुन्‍न करणारी घटना अडीच वर्षापुर्वी वर्धा जिल्‍हयातील हिंगणघाट येथे घडली होती. तरुणीला एका माथेफीरुने अंगावर पेट्रोल टाकुन जाळले होते. त्‍या जळीतकांडाचा महाविकास आघाडी सरकारला विसर पडला होता. माञ संवेदनशील उप‍मुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 25 सप्‍टेंबरला पिडीत परिवाराला आर्थिेक मदत तर केलीच शिवाय मृतक अंकीताच्‍या भावाला सरकारी नोकरीत समावून घेण्‍याचा शब्‍द दिला. The sensitive Deputy Chief Minister Devendra Fadnavis not only provided financial help to the victim’s family but also promised to accommodate the deceased Ankita’s brother in a government job.

c1_20230927_15033008
धनादेश देतांना देवेंद्र फडणवीस

हिंगणघाट शहरात मानुसकीला काळीमा फासणारी घटना 3 फेब्रुवारी 2020 ला घडली होती. एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. तब्‍बल आठ दिवस त्‍या निर्भयाने मृत्‍यूशी झुंज दिली अखेर 10 फेब्रुवारीला तिची प्राणज्‍योत मालवली. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश होता. संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते.

नुकतेच नागपुर येथे पिडीत परिवाराला उप मुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. याप्रसंगी भाजपा नेत्‍या चिञा वाघ यांनी आपले “रोखठोक” मत व्‍यक्‍त केले आहे. त्‍या म्‍हणाल्‍या की,  महाराष्‍ट्र हादरविणारी घटना घडली तेव्‍हा राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार होते तर मुख्‍यमंञी उध्‍दव ठाकरे आणि गृह राज्‍यमंञी अनिल देशमुख. घोषणाबाजी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही अडीच वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही असा आरोप यावेळी वाघ यांनी केला. माञ संवेदशील उप मुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली.

निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळेच पक्षाचा अभिमान असल्‍याचे चित्रा वाघ म्हणाल्या. निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी यावेळी महाराष्ट्राला दिला.
ROKHTHOK NEWS