Home Breaking News वाहून गेलेल्या युवकाचा शोध ‘युद्धपातळीवर’

वाहून गेलेल्या युवकाचा शोध ‘युद्धपातळीवर’

481
Img 20240613 Wa0015

जिल्हा शोध व बचाव पथक सज्ज

तालुक्यातील कोलगाव येथे मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान 24 वर्षीय युवक पैनगंगा नदीवर अंघोळीला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. बचाव पथक ‘युद्धपातळीवर’ युवकाचा शोध घेत आहे.

जीवन प्रेम बहादुर दिनार (24) हा कोलगाव येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो गावालगत असलेल्या पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेला होता. तो नदीत उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने घात झाला.

घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शीं व ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आले होते. बुधवार दि. 27 ऑक्टोबरला जिल्हा शोध व बचाव पथक पैनगंगा नदीवर पोहचले. वाहून गेलेल्या त्या युवकाचा ‘युद्धपातळीवर’ शोध घेत आहे. वृत्त लिहे पर्यंत तो आढळून आला नाही.
वणी: बातमीदार

C1 20240529 15445424