Home Breaking News Accident : ऑटोचा अपघात, विद्यार्थी ठार

Accident : ऑटोचा अपघात, विद्यार्थी ठार

● तीन विद्यार्थिनी जखमी

3661
C1 20231027 10293814

तीन विद्यार्थिनी जखमी

Maregaon News | तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविण्‍यासाठी जात असलेल्‍या ऑटोला अपघात झाला. यात एक दहावीत शिकणारा विद्यार्थी ठार झाला असुन तीन विद्यार्थिनी जखमी झाल्‍याची घटना शुक्रवार दिनांक 27 ऑक्‍टोबरला सकाळी घडली. School auto accident, student killed.

अनिकेत ऊर्फ निकेश श्रावण पिंपळशेंडे (16) असे दुर्दैवी मृतक विद्यार्थ्यांचे नांव आहे. तो केगांव येथील निवासी होता, नेहमीप्रमाणे मारेगांव येथील शिकवणीला जाण्‍यासाठी तो ऑटोने निघाला. अन्‍य विद्यार्थी घेण्‍यासाठी ऑटो मार्डी येथे गेला होता.

मार्डी वरुन मारेगांव ला येत असतांना ऑटोत तीन विद्यार्थिनी मागे बसल्‍या यामुळे अनिकेत हा चालकांच्‍या बाजुला बसला. पिसगांव शिवारात पांढरकवडा फाटयाजवळ विरुध्‍द दिशेने येत असलेल्‍या ऑटोने ऑटोला जबर धडक दिली. या अपघातात ऑटो पलटी झाल्‍याने अनिकेत खाली पडला व त्‍याचे डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

घडलेल्‍या अपघातात अती रक्‍त स्‍ञावामुळे अनिकेत चा मृत्‍यू झाल्‍याचे बोलल्‍या जात आहे. ऑटो चालक ग्राहक मिळावे याकरीता बेजबाबदारपणे वाहने हाकतांना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशी भरण्‍यात येत असतांना पोलीस प्रशासन माञ मुग गिळून गप्‍पगुमान बसताहेत. या निर्दयीपणामुळेच नाहक जीव जात असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही.
Rokhthok News