Home वणी परिसर गाव तिथे शाखा, चिखलगावातून शुभारंभ

गाव तिथे शाखा, चिखलगावातून शुभारंभ

789

संघटना बांधणीकडे शिवसेनेचे लक्ष

वणी विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणी करिता तीन भारदस्त नेते एकवटले आहेत. शिवसेनेच्या वतीने गाव तिथे शाखा हा उपक्रम राबविण्यात येत असून शहरा लगत असलेल्या चिखलगावातील बोधे नगर मध्ये रविवारी शाखेचे उद्घाटन करून फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता बहुतांश राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष देत आहे. पक्ष प्रवेश सोहळे, आंदोलने करून पक्षाच्या कार्यकर्त्यात जोश, उत्साह संचारावा यासाठी प्रयत्न करताहेत.

गाव तिथे शाखा हा उपक्रम शिवसेना राबवत असून रविवारी बोधे नगर मध्ये शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

आयोजित सोहळ्यात परिसरातील शिवसैनिकासह उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, माजी उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, उपजिल्हा संघटिका डीमन टोंगे, रुपाली कातकडे, तालुका प्रमुख रवी बोढेकर, शहर प्रमुख राजू तुराणकर उपस्थित असतील.

कार्यक्रमानंतर महादेव नगरी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शिवसेनेच्या सर्वपदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन चिखलगाव विभाग प्रमुख सोनू पावडे यांनी केले आहे.
वणी: बातमीदार