Home Breaking News वणीत घातक डिस्टील्ड वॉटरचे हल्ले सुरूच

वणीत घातक डिस्टील्ड वॉटरचे हल्ले सुरूच

920
Img 20240613 Wa0015

o● तीन दिवसात 3 बालकांवर हल्ला

वणी: येथील मोमीनपुरा परिसरात मागील तीन दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून अल्पवयीन बालकांवर बॅटरी मधील घातक डिस्टील वॉटरचे हल्ले सुरु आहेत. सोमवार दि. 27 डिसेंबरला 5 वर्षाच्या बालकांला जखमी करण्यात आले असून आजपर्यंत जखमी बालकांची संख्या तीन झाली आहे.

येथील अ.हमीद चौकात राहणाऱ्या शफीउल्ला खा यांच्या जुबेर व अकसा या दोन मुलावर दि.25 व 26 डिसेंबरला बॅटरी मधील घातक डिस्टील्ड वॉटर टाकून जखमी केले होते. या घटनेने घाबरलेल्या शफीउद्दीन यांनी काल रात्री वणी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी  तक्रारीची दखल घेत शोधकार्य सुरू केले होते मात्र आरोपी पर्यंत पोहचायच्या आत सोमवारी पुन्हा 5 वर्षाच्या एका मुलावर असाच हल्ला करून जखमी करण्यात आले आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, ठाणेदार श्याम सोनटक्के व डीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.

वणी: बातमीदार

C1 20240529 15445424