Home Breaking News वणी – वरोरा मार्गावर दोन दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी

वणी – वरोरा मार्गावर दोन दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी

3255

महामार्गावर अपघाताची शृंखला वाढली

वणी:– वणी -वरोरा मार्गावर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यात एकाचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला.

राजु बिरीया असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताचे सुमारास ते आपल्या बुलेट या दुचाकीने वरोऱ्यावरून वणी कडे येत होते.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची आपसात धडक झाली यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. त्यांना वरोरा येथे प्राथमिक उपचारा नंतर चंद्रपूर येथे हलवण्यात येत असतांना राजू बिरीया यांचा मृत्यू झाला आहे.

राजू बिरीया हे मूळ वरोरा येथील रहिवासी होते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यवसाया करिता वणी येथील रंगरिपुरा येथे राहत होते. त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार