Home Breaking News ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक, दोन ठार, एक गंभीर जखमी

ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक, दोन ठार, एक गंभीर जखमी

1624
C1 20240404 14205351

महागाव- उमरखेड मार्गावरील घटना

रोखठोक | महागाव तालुक्यातील मुडाना गावाजवळ नवीन ट्रॅव्हल्स व ट्रॅक ची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक दगावले असून ट्रक वरील क्लिनर गंभीर झ जखमी झाला आहे. ही भीषण घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.

अरुण पुंडलिक सिरसे (44) रा अमूलगा ता. कंधार जि. नांदेड असे ट्रक चालकाचे नाव आहे. तर झारखंड राज्यातील बेलाजुडी पो. होरचुणी जि. सिंहभुज येथील ट्रॅव्हल्स चालक बापी मकरा कर्मकार (30) असे दोघे चालक अपघातात दगावले आहेत. तसेच ट्रक वरील क्लिनर साई दगडू कदम (25) गंभीर जखमी झाला आहे.

कोळसा भरलेला ट्रक क्रमांक MH-26-BE-4121 हा महागाव वरून उमरखेड कडे जात होता. तर विरुद्ध दिशेने येणारी नविन मार्कोओलॉ कंपनीची स्टारबस ट्रॅव्हल्स महागावच्या दिशेने येत होती. या दोन्ही वाहनाची मुडाना गावाजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. यात दोन्ही चालक घटनास्थळीच ठार झाले.

या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले पोलिसांना सूचित करण्यात आले तर जखमीला सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड ला हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे
महागाव : बातमीदार