Home Breaking News आ. बोदकुरवार गटाची बाजार समितीत “सरशी”

आ. बोदकुरवार गटाची बाजार समितीत “सरशी”

● 14 जागेवर मिळवला दणदणीत विजय

6410
C1 20240404 14205351

14 जागेवर मिळवला दणदणीत विजय

रोखठोक | कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या 18 संचालक पदा करिता निवडणूक पार पडली. निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या शेतकरी एकता पॅनलने 14 जागेवर दणदणीत विजय मिळवला असून बाजार समितीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. Mla Sanjeevreddy Bodkurwar’s Shetkari Ekta panel won 14 seats by a market committee.

वणी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आ. बोदकुरवार व ऍड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वातील शेतकरी एकता पॅनल व माजी आमदार वामनराव कासावार, विश्वास नांदेकर यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये चुरशीची लढत झाली.

बाजार समितीची निवडणूक अटीतटी ची होईल असे वाटत असतानाच आ. बोदकुरवार यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवल्याचे दिसत असून 18 पैकी 14 उमेदवार निवडून आणले आहे. तर महा विकास आघाडीला अवघ्या 4 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

सहकारी संस्था गटातील विजयी उमेदवार
शेतकरी एकता पॅनल चे ऍड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेणूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद वासेकर

ग्राम पंचायत गटातील विजयी उमेदवार
शेतकरी एकता पॅनल चे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार

व्यापारी अडते व हमाल गटातील विजयी उमेदवार
शेतकरी परिवर्तन पॅनलचे सतीश बडघरे, रवींद्र कोंगरे व प्रमोद सोनटक्के हे विजयी झाले आहेत.
वणी: बातमीदार