Home Breaking News ग्रामिण रुग्णालयाला आमदार निधीतून रुग्णवाहिका

ग्रामिण रुग्णालयाला आमदार निधीतून रुग्णवाहिका

376
C1 20240404 14205351

आमदार बोदकूरवार यांच्या हस्ते लोकार्पण

वणी : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी तालूक्यातील रूग्णांच्या सेवेसाठी आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयाला रूग्णवाहिका भेट दिली. रूग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवार दि. 27 मे ला करण्यात आले.

येथील ग्रामीण रूग्णालयात एकच रूग्णवाहिका असल्याने रूग्णांची चांगलीच गैरसोय होत होती. रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता आपल्या विकास निधीतून तात्काळ रूग्णवाहिका भेट देऊन रूग्ण सेवेची कर्तव्यपूर्ती केली.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणिस रवि बेलूरकर, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, तारेंद्र बोर्डे, शंकर लालसरे, तालूका अध्यक्ष गजानन विधाते, श्रीकांत पोटदूखे, राकेश बूग्गेवार, मनोज सरमूकदम, प्रविण पाठक, कैलास पिपराडे, शंकर बांदुरकर, नितीन वासेकर, विलास निमकर, अविनाश आवारी, आशिष डंभारे, वैभव मांडवकर, संध्या अवताडे, स्मिता नांदेकर, प्रिती बिडकर, लोथेताई व ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सूलभेवार व रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार