Home Breaking News महावितरणला वेळीच आवरा… अन्यथा…!

महावितरणला वेळीच आवरा… अन्यथा…!

478
C1 20240404 14205351

राजू उंबरकर आक्रमक, SDO यांना निवेदन

वणी: उप विभागात महावितरण कंपनीचा तुघलकी कारभार सुरू आहे. उष्णतेच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असतानाच सक्तीची वीज वसुली व वीज पुरवठा खंडीत करणे सुरूच असल्याचा आरोप मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी SDO यांना दिलेल्या निवेदनातून केला असून महावितरणला वेळीच आवरा, अन्यथा…तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

जनतेच्या जीवावर उठलेल्या वीज वितरण कंपनीने सक्तीची वीज वसुली व वीज पुरवठा खंडीत करणे सुरूच ठेवले आहेत. उप विभागात धनदांडगे, राजकिय पुढारी व शासकिय कार्यालयाला अभय तर सर्वसामान्य व नियमित भरणा करणाऱ्या सामान्य नागरिकांना सक्ती करण्यात येत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

रखरखत्या उन्हात नागरिकांच्या घरातील वीज कापून नाहक त्रास देण्याचे काम महावितरणद्वारे केल्या जात आहे. लॉकडाउन काळात वीज कंपनीने विद्युत बिल रिडींग न घेता मनमानी प्रकारे चुकीचे व जास्तीचे वीज बिले दिलेली आहेत व हे अवाजवी बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची धमकी वीज कंपनीचे कर्मचारी देत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

शासकीय नियमाप्रमाणे विज कापणीच्या पूर्वी नागरिकांना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. परंतु महावितरणद्वारे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात येत आहे. नागरिकांना वीज बिल भरण्यास सवलत व वीज देयक भरण्याचे तसेच सुरळीत हप्ते पाडून देण्याऐवजी धमकविले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांना नवीन मीटर साठी पैसे भरून सुद्धा वाट बघावी लागत आहे. तसेच नादुरस्त मीटर चे अर्ज करून सुद्धा मीटर दुरुस्त करून दिल्या जात नाही किवा मीटर बदलविल्या जात नाहीं. अशा महावितरण कंपनीच्या नानाविध तक्रारीचा तथा बोगस कारभाराचा पाढाच राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर वाचला आहे. तरी महावितरणला वेळीच आवरा अन्यथा तीव आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअस च्या जवळपास आहे. अशा रखरखत्या उन्हात नागरिकांच्या घरातील वीज खंडित केल्यानंतर जर कोणा एका नागरिकांचा जीव गेल्यास महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्तब्ध बसणार नाही.
राजू उंबरकर
राज्य उपाध्यक्ष, मनसे