Home वणी परिसर इसमाला लाथाबुक्याने मारहाण

इसमाला लाथाबुक्याने मारहाण

480
Img 20240613 Wa0015

विरकुंड येथील घटना 

वणी बातमीदार :-तालुक्यातील विरकुंड येथील 66 वर्षीय इसमाला गावातील 22 वर्षीय युवकाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि 24 जुलै ला घडली.

विरकुंड येथील कवडू काशिनाथ मोतेकर वय 66 हे 24 जुलै ला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास गावातील बस स्टॉप कडे जात जात असतांना सतीश अशोक थेरे वय 22 याने त्यांना मागून लाथ मारून खाली पाडले व त्याच्या छातीवर बसून त्यांना जबर मारहाण केली, यामध्ये कवडू जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले होते उपचार करून आल्यावर त्यांनी दि 28 जुलै ला थेट वणी पोलीस ठाणे गाठले व सतीश विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सतीश विरोधात गुन्हा नोंद केला आहे

C1 20240529 15445424
Previous articleविदर्भ द्या अन्यथा .. चालते व्हा
Next articleचिंचमंडळ वासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.