Home वणी परिसर विदर्भ द्या अन्यथा .. चालते व्हा

विदर्भ द्या अन्यथा .. चालते व्हा

283
C1 20240404 14205351

वामनराव चटप यांचा “रोखठोक” इशारा

वणी बातमीदार: कोरोना कालखंडातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे,  पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 9 ऑगस्ट ला विदर्भ चंडिका मंदिर, शहिद चौक नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भ द्या अन्यथा .. चालते व्हा… असा “रोखठोक” ईशारा विदर्भवादी नेते, माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांनी सोमवारी येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत भाजप सरकार ला दिला.

नागपूर येथे पुढील महिन्यात आयोजितआंदोलनाला संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवादी सामील होणार आहे सन 1997 ला भाजपच्या कार्यकारिणी मध्ये भुवनेश्वर ला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड या तीन राज्याची निर्मिती केली परंतु विदर्भ दिला नाही. विदर्भाच्या जनतेवर तेव्हाही भाजपने अन्यायच केला.

भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्यकरिता त्यावेळी आग्रही भूमिका घेतली होती. सध्यस्थीतीत त्यांना विसर पडल्याचे वामनराव चटप यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केल्याचा आरोप करत भाजपच्या  केंद्र सरकारने विदर्भ न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

आयोजित बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रांगरेज, देवराव धांडे, राहुल खारकर, राजू पिंपळकर, बाळासाहेब राजूरकर, आकाश सूर,मंगेश रासेकर,संजय चिंचोळकर,शालिनीताई रासेकर, मंदा बांगरे, दशरथ पाटील, राहुल झट्टे,  होमदेव कनाके, देवा बोबडे, अनिल गोवरदीपे, संध्या रामगिरवर, पुरुषोत्तम निमकर, सुरेखा वडीचार, सुषमा पाटील, अल्का मोवाडे यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.