Home क्राईम 14 लाख रुपयांच्‍या दारु साठयावर चालवला ‘रोडरोलर’

14 लाख रुपयांच्‍या दारु साठयावर चालवला ‘रोडरोलर’

● 245 गुन्हयात जप्‍त करण्‍यात आली होती दारु ● वणी पोलीसांची कारवाई

1297

245 गुन्हयात जप्‍त करण्‍यात आली होती दारु
वणी पोलीसांची कारवाई

Wani News : पोलीसांनी अवैद्य दारु विक्री बाबत केलेल्‍या कारवाईत मोठया प्रमाणात दारु साठा जप्‍त केला होता. अशा एकुन 245 गुन्‍हयातील तब्‍बल 14 लाख रुपयांचा दारूसाठा नष्ट करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. सोमवार दिनांक 28 ऑगष्‍टला पोलीसांनी भालर मार्गावरील डपिंग ग्राउंड जवळ त्‍या दारु बॉटलवर रोडरोलर फिरवला. The court ordered the destruction of liquor stock worth Rs 14 lakh in 245 cases.

पोलीस स्‍टेशन हददीतील अवैद्य दारु विक्रेत्‍यांवर जरब बसावी याकरीता पोलीसांनी मागील काही वर्षापासुन धडक मोहिम राबवली होती. अनेक अवैद्य दारु विक्रेत्‍यांना गजाआड करुन दारु साठा जप्‍त करण्‍यात आला होता. याप्रकरणी न्‍यायालयाने जप्‍त करण्‍यात आलेल्‍या दारुला नष्‍ट करण्‍याचे आदेश पारित केले होते.

न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन करत पोलीसांनी जप्‍त करण्‍यात आलेल्‍या दारु साठयाला नष्‍ट करण्‍याचे ठरवले आणि सोमवारी भालर मार्गावरील डपिंग ग्राउंड जवळ 14 लाख रुपये किमतीच्‍या देशी विदेशी दारु बॉटलवर रोड रोलर फिरवला यावेळी ठाणेदार अजित जाधव,  नायब तहसिलदार विवेक पांडे, सपोनि माया चाटसे व पोलीस कर्मचारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.
Rokhthok News