Home क्राईम अरेच्चा..घरफोडी… चोरटे शिरजोर, पोलीस कमजोर

अरेच्चा..घरफोडी… चोरटे शिरजोर, पोलीस कमजोर

● चार ते पाच घरे चोरट्यांच्या निशाण्यावर ● अखेर चोरट्यांनी कार चोरली

780

चार ते पाच घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
अखेर चोरट्यांनी कार चोरली

Crime News Pandharkwda |
मागील काही दिवसांपासून पोलिसांची कार्यपद्धती क्षिथील झाल्याचे दिसून येत आहे. अवैद्य व्यवसायावर अंकुश तर राहिलेला नाहीच शिवाय भुरटे चोरटे सुद्धा शिरजोर झाले आहेत. चोरट्यानी धुमाकूळ घातला. गोकुलनगरीतील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला. अन्यत्र चार ते पाच घरात चोरीचा प्रयत्न केला, अखेर चक्क कार चोरली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. On Sunday night, unknown thieves broke the door of the house and looted 60,000 jewels and 90,000 rupees in cash from the cupboard.

गोकुळनगरी येथील निवासी मारोती रामकृष्ण दुधलकर यांनी पोलिसात रीतसर तक्रार नोंदवली. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे दार तोडुन कपाटातील 60 हजाराचे दागीने व 90 हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. तर त्याच रात्री चोरट्यांनी रात्री 1 ते 4 च्या दरम्यान गोकुळ नगरीतील चार ते पाच घरे फोडण्याचा प्रयत्न केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चोरट्याना अन्य ठिकाणी अपयश आल्याने त्यांनी चक्क शिफ्ट डिझायर कार क्रमांक MH -29- R- 786 चोरली. याप्रकरणी ठाणेदार अमोल माळवे यांना कळताच त्यांनी तपास यंत्रणा कार्यान्वित केली. घडलेल्या घटना डोकेदुखी ठरण्यापूर्वीच त्यांनी गस्त वाढवली. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी खबऱ्याना सतर्क केले.

पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीत एकाच रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा सुगावा लागावा याकरिता प्रयत्न सुरू असतानाच चोरट्यानी लांबवलेली कार कृष्णा टेकडी परिसरात गवसली. मात्र शहरात घरफोडी करणारे चोरटे भुरटे नसून निष्णात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी गस्त वाढवून अवैद्य धंद्यावर सुद्धा करडी नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.
ROKHTHOK NEWS