Home Breaking News ट्रकला भीषण धडक, दुचाकीस्वार ठार

ट्रकला भीषण धडक, दुचाकीस्वार ठार

1545
C1 20240404 14205351

गौराळा फाट्या जवळील घटना

रोखठोक | साळ्याचं लग्न आटोपून मारेगाव ला आपल्या दुचाकीने जात असताना झालेल्या भीषण अपघात 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गौराळा फाट्या जवळ बुधवार दि. 28 डिसेंबर ला सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली.

विनोद किसन परचाके (42) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील सोनापूर येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी एका लग्न समारंभाकरिता तो चिखलगाव येथे गेला होता. कार्यक्रम आटोपून तो दुचाकीने मारेगाव ला जायला निघाला. गौराळा फाट्याजवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली.

या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींनी त्याला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले असून मृतकाच्या पश्चात आई -वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. विनोदच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार

ही बातमी सुध्दा महत्वाची….

https://rokhthok.com/2022/12/28/18586/

 

Previous articleकारवाई…….भाडे व कर थकविणारे सात गाळे ‘सील’
Next articleभूषण भेदी यांचे निधन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.