Home Breaking News विद्यार्थ्यांचे धमाल नृत्य आणि टाळ्यांचा कडकडाट

विद्यार्थ्यांचे धमाल नृत्य आणि टाळ्यांचा कडकडाट

1623
C1 20240404 14205351

स्वर्णलीला शाळेत स्पंदन महोत्सव

रोखठोक |:- येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्पंदन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता विशेष परिश्रम शिक्षकवृंदानी घेतले.

आयोजित कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, स्वर्णलीलाचे अध्यक्ष डॉ. व्ही. नरेंद्र रेड्डी, प्राचार्या डॉ. सौजन्या उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या महोत्सवामध्ये विविध भाषांमध्ये गीत गायन, नृत्य आणि नाटक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नर्सरी ते 10 व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

मान्यवरांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी : बातमीदार